Description
नवी जीवनदृष्टी आणि आशयदृष्ट्या सखोलता तसेच जागतिक दर्जा, यांच्यासह द मंक हू सोल्ड हिज फेरारी च्या मालिकेतील हे एक नवीन पुष्प आहे. आपल्या विधिलिखिताचा शोध घ्या. दार सैंडरसन ह या संपूर्ण कथेचा नायक. अत्यंत उमद्या स्वभावाचा पण महत्त्वाकांक्षी एक्झिक्युटिव्ह, आपल्या कुटुंबापासून (बायका – मुलांपासून) तुटतो आणि जीवनात गमावलेला अर्थ मृत्युत शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याचे अवघे व्यावसायिक जीवनही एकेक्षणी विस्कळीत होवून जाते. एकूणच वेदनेत बुडालेल्या दारची एका आंतरिक शांततेच्या व जागृतीच्या गाभ्यापर्यंतची परिपक्कतेकडे जाणारी वाटचाल यात चित्रित केली गेलेली आहे. ती विलक्षण नाट्यपूर्णतेने.
मृत्यूच्या दारापाशी आयुष्य संपवायला गेलेल्या दारची एके क्षणी जूलियन मेंटलची गाठ पड़ते आणि त्याचे अवघे आयुष्यच बदलून जाते. त्याच्या आत्म्याला जाग येते आणि एका नव्या जागरणाचा प्रारंभ होतो. खरे तर हे एक आत्मिक पुनरुथ्थानच आहे. एका असामान्यत्वाकडे जाणारी ही अभिजात पाऊलवाट आहे. या वाटेवरून प्रवास करताना जूलियन, दार सैंडरसनला स्व-जागृतीच्या सात संकेतप्रणाली कथन करतो आणि मग दारची वाटचाल एक दिव्यत्वाच्या दिशेने उत्क्रांत होत राहते. अशा या नाट्यपूर्ण आणि सखोल विचारसूत्रात तुम्हाला महानतेची एक नवी वाट गवसेल. रॉबीनची विश्वव्यापक जीवनदृष्टी तुम्हाला सामान्यत्वाच्या दलदलीतून बाहेर काढत असामान्यत्वाकडे, सर्वोत्कृष्टतेकडे तसेच एका सौंदर्यशील वैभवशिखराकडे सहज घेऊन जाईल.
काही प्रभावी – परिणामकारण स्व-जागृतीची सात विचारसूत्रे –
- अमर्यादशील चैतन्यक्षमतेवर विश्वास ठेवत स्वला संपूर्णपणे जाणून घ्या.
- स्व चा घात करणाऱ्या भासचित्रांना नाकारा व महानतेकडे आपला मोर्चा वळवा.
- साक्षात्कारी क्षण आणि विकासाच्या नवनव्या वाटा
- आनंदी व सुखमय जीवनासाठी मार्गदर्शकाकडून योग्य बोध (अपयशातून पक्वतेकडे)
- प्रतिकूलतेवर, भीतीवर मात करीत उज्वल भविष्याकडे वाटचाल करा.
- संपूर्ण परिवर्तन आणि पुनर्जन्माची मनोवस्था, जीवनाचा आद्य हेतू जाणून घ्या.
- सततची प्रयोगवस्था व महान आत्मजागृती (निर्भयपणे जगणे व प्रवासमग्नता)

Reviews
There are no reviews yet.