Description
द मंक हू सोल्ड हिज फेरारी या जगप्रसिद्ध खपाच्या ग्रंथाचे लेखक, मॅनेजमेंट गुरू आणि व्यावसायिक स्तरांवरील प्रभावी वक्ते म्हणून ख्यातकीर्त असलेल्या रॉबिन शर्मा यांनी मोठ्या विश्वासाने, बांधिलकीने एक नवी तत्त्वप्रणाली तुमच्या स्वाधीन केली आहे. ज्याच्या बोगे तुम्ही केवळ वैयक्तिक स्तरांवरच नव्हे तर जागतिक स्तरांवरही एक समृद्ध आणि साफल्यमय जीवन जगू शकाल.
तुमच्या कंपनीतील लोडर्सना, मॅनेजर्सना सर्वाथनि प्रशिक्षित करण्यासाठी नेतृत्त्वदृष्टीच्या आठ संकेतप्रणाली या प्रात्यक्षिकतेसह दिल्या आहेत. त्याच्या योगे तुमच्या आत दडलेल्या चैतन्याची वृद्धी होत तुम्ही तुमच्या जीवनात व व्यवसायात हवे ते उद्दिष्ट सहज साध्य करू शकाल. ही तत्त्वे सहज आकलनीय असून तुम्हाला सखोलतेने प्रेरणादायी ठरतील.
जीवनातील योगदान व जीवनाची महत्ता एकदा लक्षात आल्यावर तुम्ही या जगताला खूप काही देऊ शकाल आणि जाताना मागे आपला समृद्ध व सधन वारसा पुढील पिढ्यांच्या तळहातावर निश्चित ठेवाल !

Reviews
There are no reviews yet.