द पॅराडॉक्सीकल प्राईम मिनिस्टर

450.00

1 in stock

पुस्तकाचे नाव द पॅराडॉक्सीकल प्राईम मिनिस्टर
लेखक शशी थरूर
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५७६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ५०० ग्रॅम

Description

आपल्या तरुण वयातच आपल्या नशिबावर असलेला दृढ विश्वास आणि सत्ताप्राप्तीसाठी एकाग्रपणे केलेला पाठलाग याबाबतीत नरेंद्र मोदी हे नक्कीच नेपोलियनसारखेच आहेत. फ्रान्सच्या त्या अद्वितीय नेत्याकडे असलेले गुण त्यांच्यातही आहेत याचा पुरावा म्हणून त्यांचे अनेक प्रशंसक त्यांची दूरदृष्टीची भाषणे, त्यांच्या वाढत्या  महत्त्वाकांक्षा, आणि त्यांची स्वतःच्या आणि भारताच्या नियतीवर असलेली अढळ श्रद्धा याकडे लक्ष वेधत असतात. मात्र, नेपोलियन मध्ये कितीही दोष असले तरी हि आठवला जातो तो त्याच्या विलक्षण दूर दूरदृष्टीसाठी आणि धार्मिक सहिष्णुता, मालमत्ता हक्क आणि न्यायाबाबत समानता यांत असलेली त्याची श्रद्धा आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी ज्यांतील अनेक कल्पना या आजच्या जगातही महत्वाच्या आहेत, पण हेच सार नरेंद्र मोदी यांच्याबाबत म्हणता येत नाही. त्यांची भाषणे लक्षवेधक असतात, पण त्यांच्या कल्पनांच्या अंमलबजावणीत ते अक्षम ठरले आहेत. त्याचवेळी भारताच्या संपन्नतेला ग्रहण लावणाऱ्या शक्तींना थोपवण्यास किंवा रोखण्यास ते अपयशी ठरले आहेत. त्यांच्या नजरेसमोर धर्मांध, जातीय आणि विघटनवादी शक्ती थैमान घालत आहे. ज्यामुळे भारत अनेक दशके मागे फेकला गेला आहे आणि त्यामुळे एक महान मुत्सद्दी आणि सत्ताधारी म्हणून ओळखले जाण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही गुणांवर त्यांचे सकारात्मकपणे मूल्यमापन करणे कठीण आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द पॅराडॉक्सीकल प्राईम मिनिस्टर”

Your email address will not be published. Required fields are marked *