Description
हा केवळ सत्यशोधकीय पत्रकारितेचा इतिहास नाही, तर गेल्या दीडशे वर्षांचा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा अमूल्य दस्तावेज आहे. डॉ. शिंदे यांनी या नियतकालिकांचे केवळ सामाजिक स्वरूप व योगदान यांचीच दखल घेतलेली नसून, त्यांचे वाङ्मयीन मूल्यही चिकित्सेच्या कक्षेत आणले आहे. या काळात एक पर्यायी निकोप संस्कृती कशी आकार घेत होती, त्याचे चित्रण त्यांनी आपल्या या ग्रंथातून केले आहे. ज्यांना आपल्या क्रांतिकारक भूतकाळाविषयी कृतज्ञता आहे आणि ज्यांच्या मनात आपल्या समाजाच्या भवितव्याविषयी चिंतेबरोबरच प्रचंड आशाही आहे, आस्थाही आहे आणि जे आपल्या भावी पिढ्यांसाठी देखणी आणि निरामय स्वप्ने पहात आहेत, त्या सर्वांसाठी हा ग्रंथ महत्त्वाचा ठरणार आहे. एका दृष्टीने हा ग्रंथ सर्वच मराठी वाचकांसाठी आणि संशोधकांसाठी प्रकाशाची एक नवी वाट निर्माण करीत आहे, यात शंका नाही. मी डॉ. शिंदेंचे या ग्रंथाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना अशाच भरीव व कसदार लेखनासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी आता आमच्या अपेक्षा खूप वाढवून ठेवल्या आहेत, याची त्यांना मुद्दाम आठवण करून देतो !

Reviews
There are no reviews yet.