सण आणि उत्सव हे मानवी जीवनातील भावात्मक व आशयसंपन्न घटक आहे. सण-उत्सवात रस-गंध-रंग-ध्वनी-स्पर्श अशा ऐंद्रिय संवेदना जागविल्या जातात. दैनंदिन एकारलेल्या जीवनात अर्थपूर्णता व सौंदर्यसंवेदना निर्माणाचे काम सण-उत्सवातून होते. त्याचबरोबर जीत-जेत्यांच्या विजय-पराभवांचे प्रतीकात्मक चिन्हांकनही सण-उत्सवातून होत असते. सामान्यतः वाईटावर चांगल्याचा विजय हे सण-उत्सवाचे वैशिष्ट्य सांगितले जाते. मात्र दिवाळीच्या सणामध्ये गोवत्सद्वादशी, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा असे क्रमाने साजरे केले जाणारे सण-उत्सव हे ब्राह्मणी षड्यंत्रातून विकसित झालेले दिसून येतात. सद्गुणी, दानशूर व पराक्रमी बळीराजावर कपटी वामनाने अनीतीने विजय मिळविल्याचे दिसून येते. तसेच तुळशी विवाहाच्या कथेतील जलंधराची पतिव्रता पत्नी वृंदा हिच्यावर विष्णूने बलात्कार करून जलंधराचे खच्चीकरण करून त्यास पराभूत केले, असे दिसून येते. त्यामुळे इथल्या लोकपरंपरा, लोकसाहित्य, पूजाविधी व ब्राह्मणी ग्रंथांची चिकित्सा यांच्या माध्यमातून दिवाळीचा खरा इतिहास शोधावा लागतो. भारतविद्येचे अभ्यासक डॉ. राजेंद्र कुंभार यांनी हा दिवाळी सणाचा खरा अर्थ चिकित्सकपणे मांडलेला आहे. तो वाचकांना आपल्या परंपरेकडे पाहण्याचे नवे भान देईल, हे निश्चित !

Reviews
There are no reviews yet.