अन्न हे अपूर्णब्रह्म

360.00

1 in stock

पुस्तकाचे नाव अन्न हे अपूर्णब्रह्म
लेखक शाहू पाटोळे
ISBN 9789391352790
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २६४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २८० ग्रॅम

Description

‘ अन्न हे पूर्णब्रह्म ‘ या म्हणण्यातील फोलपणा स्पष्ट करणारं शाहू पाटोळेचं हे पुस्तक आहे. आजवर अस्पर्शित राहिलेला हा विषय असून  महत्त्वाचं म्हणजे, अभिजनांच्या खाद्यविषयक प्रस्थापित समाजांना धक्का देणारं, तसंच आकलनाच्या कक्षा वैपुल्याने विस्तारणारं हे लेखन आहे. मराठीत खाद्यसंस्कृतीशी संबंधित आजवर जो मजकूर प्रकाशित झाला आहे तो, संपूर्ण समाजाच्या खाद्य संस्कृतीचं यथार्थ चित्रण करणारा कसा नव्हता, याची एक सूत्र जाणीव हा मजकूर वाचल्यानंतर येते आणि आपल्या अज्ञानाची वीण उसवत जाते.

गावकुसाबाहेर जगणाऱ्यांच्या खाद्य जीवनाचा धांडोळा शाहू पाटोळे यांनी अत्यंत वेधक शैलीत मांडला आहे. या लेखनात विद्रोह आहे, पण त्या विद्रोहाचा दाह  जाणवत नाही. कधी स्वगत, कधी आत्मपरीक्षण, कधी संबोधन तर कधी समाजातील जातिव्यवस्थेवर बोचकारे काढत / बोचकारे ओढत हा मजकूर आपल्यासमोर येतो. जातीच्या उतरंडीतून वाट्याला आलेल्या जगण्याबद्दल किंचित खंत या लेखनात जाणवते मात्र, ती पूर्ण क्षम्य आहे. लेखकानं विलक्षण ताकदीनं एक प्रकारचा खाद्यविद्रोह प्रवाही शैलीत व्यक्त केला आहे.

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अन्न हे अपूर्णब्रह्म”

Your email address will not be published. Required fields are marked *