Description
आपण ‘ आपण ‘ आहोत !
आपण ‘आपण ‘ आहोत, हे भान किती स्वाभिमानाचे आहे, किती आनंद देणारे आहे ! ते कसे आपणास रोमांचित करून टाकणारे आहे ! याउलट आपण ‘आपण ‘ नसून दुसरेच कुणी तरी आहोत किंवा दुसऱ्या कुणाची तरी छाया आहोत, हि जाणीव आपल्या अस्तित्त्वाच्या देठालाच कुरतडणारी आहे.
म्हणूनच, अब्राम्हणांना माझी कळकळीची विनंती आहे, कि जीवनाच्या सर्व क्षेत्रांतून उत्तुंग झेप घ्या, असामान्य कर्तृत्व गाजवा, पण तुम्ही ‘ तुम्हीच ‘आहात, हे कधीही विसरू नका. त्या कर्तृत्वाने तुमचा चेहरा – तुमचा स्वतःचा चेहरा, तुमच्या स्वकीयांना चेहरा उजळून निघू द्या. दुसऱ्या कुणाच्या चेहऱ्याआड स्वतःचा चेहरा लपवू नका, तुमच्या कर्तृत्वावर दुसऱ्या कुणाची मुद्रा उमटवू देऊ नका. स्वतःचे कर्तृत्व स्वतःचे म्हणून अत्यंत नम्रपणाने, पण तितक्याच ठामपणे मिरवा. त्याचे श्रेय भलत्यासलत्यांना देऊ नका. आपण विशिष्ट क्षेत्रात कर्तृत्ववान झालो, म्हणजे ‘ ब्राम्हण ‘ झालो, असे म्हणून स्वतःला आणि आपल्या रक्तामांसाच्या लोकांना कमीपणा आणू नका.
ब्राम्हणांच्या भुवयांना आपल्या जीवनप्रवासाची होकायंत्रे मानू नका !
Reviews
There are no reviews yet.