श्री बसवेश्वर

45.00

9 in stock

पुस्तकाचे नाव श्री बसवेश्वर
लेखक आर. सी. हिरेमठ
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ४०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ७० ग्रॅम

Description

सामाजिक क्रांती हा या महान चळवळीचा महत्त्वाचा घटक होता. बसवेश्वर समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्त्वांच्या बाजूने ठामपणे उभा राहिला. त्याने कधीही समाजातील वर्चस्वी उतरंडीला मान्यता दिली नव्हती. त्याच्या दृष्टीने जात, वंश, व्यवसाय इत्यादी कुठल्याही मुद्द्याच्या आधारावर कोणीही लहान-मोठा ठरत नव्हता. सगळे जण समान होते. समाजात सखोल रुतलेली वर्णाश्रम व्यवस्था उखडून टाकण्यासाठी त्याने जन्मभर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. बसवेश्वर हा महाप्रधान असताना नेहमीच औपचारिकदृष्ट्या तथाकथित अस्पृश्य असलेल्या शिवांगमय्यासोबत जेवण घेत असे. अशा प्रसंगांमुळे तत्कालीन पारंपरिक समाजात खळबळ निर्माण झाली असावी. जुन्या परंपरांचे समर्थक असलेल्या सनातनी आणि कोंडेया मनचन्नासारख्या दुष्ट लोकांनी बिज्जलाच्या कानावर बसवेश्वराविषयीच्या खोट्यानाट्या गोष्टी घालून बसवेश्वराची प्रतिमा मलिन करण्यास सुरुवात केली. बसवेश्वराला मिळालेल्या प्रचंड यशामुळे ते त्याचा मत्सर करत होते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्री बसवेश्वर”

Your email address will not be published. Required fields are marked *