शारदा झाली सरस्वती

36.00

8 in stock

पुस्तकाचे नाव शारदा झाली सरस्वती
लेखक अशोक राणा
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ३२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ५५ ग्रॅम

Description

‘शारदा’ ही विद्येची देवता आहे. सरस्वतीला अनेक नावांबरोबर ‘शारदा’ हे नाव असले तरी शारदा म्हणजे सरस्वती  नव्हे हंस किंवा मोर ही सरस्वतीची वाहने आहेत परंतु, शारदेला वाहन असल्याचे ज्ञात नाही. मध्यप्रदेशातल्या सतना जिल्ह्यातील मैहर तालुक्यातील नैसर्गिक रुपात समृद्ध अशा तैमूर आणि विंध्य पर्वतरांगांमध्ये हे स्थान आहे. तमसा नदीच्या तटावर त्रिकूट पर्वतावर 600 फुट उंचीवर  शारदेचे मंदिर आहे. शारदा देवीचे भारतातील हे एकुलते एक मंदिर असावे, असे म्हटले जाते. परंतु, हे खरे नाही. भारतात आणखी काही शारदा मंदिरे आहेत. शारदा ही विद्येची देवता म्हणून काश्मीरमध्ये  प्रसिद्ध होती. शामशबरी पर्वत रांगांमधून उगम पावलेल्या मधुमती आणि किशनगंगा या नद्यांच्या संगमावर तिचे मंदिर वसलेले होते. काश्मीरची ती स्थानिक मातृदेवता म्हणून पूजनीय ठरली होती. म्हणूनच काश्मीरचा प्राचीन ग्रंथांमधील उल्लेख शारदा प्रदेश असा केला गेलेला आढळतो. सतीचा उजवा हात म्हणजे अध्ययन आणि लेखनाचे प्रतिक आहे. तो जिथे पडला त्याठिकाणी शारदा मातेचे मंदिर उभारले गेले. अशी जी आख्यायिका प्रचलित झाली, तिचा प्रतीकात्मक अर्थ हे विद्यार्जनाचे केंद्र होते असा होतो. लिहिण्यासाठी अतिशय प्रसिद्ध  अशी ‘शारदा लिपी’ ही याच प्रदेशातून प्रसृत झाली होती.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शारदा झाली सरस्वती”

Your email address will not be published. Required fields are marked *