Description
उशीर झाला असला तरी अखेरीस त्या माणसाला न्याय देण्यात आला.
अनेक वर्षांच्या टाळाटाळीनंतर अखेरीस भाजपने विनायक दामोदर सावरकरांना त्यांचा नायक आणि सांप्रदायिक व्यक्तिमत्त्व म्हणून सार्वजनिकरित्या आणि अगदी स्पष्टपणे मान्यता देऊन त्यांचे ऋण मान्य केले आहे. भारतीय राष्ट्रवादाचे आधीचे प्रख्यात प्रतीक असलेल्या गांधींना त्या स्थानावरून पदच्युत करून त्यांच्या जागी सावरकरांना राष्ट्रीय नायक म्हणून प्रस्थापित करण्याचे प्रयत्न भाजप करत आहे. मात्र हा उद्योग जोखमीने भरलेला आहे. यात सत्य खुलेपणाने बाहेर पडण्याची जोखीम आहे.
या पुस्तकातून हिंदुत्वाचे जनक असलेल्या सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्यात आला आहे. त्यामधून जे बाहेर येते ती गोष्ट खुशामतीच्या सुखद कल्पनेतून साकारलेल्या प्रतिमेत भर टाकत नाही. सावकारांनी ‘प्रादेशिक राष्ट्रवादा’च्या समावेशक, धर्मनिरपेक्ष संकल्पनेला नाकारून ‘सास्कृतिक राष्ट्रवादा’च्या वगळणुकीच्या, जातीयवादी संकल्पनेचे समर्थन केले. त्यांनी सातत्याने क्षमायाचना केली आणि सरकारला लेखी हमीपत्रे किंवा खरे तर माफीनामे दिले. त्यांचा एकाहून जास्त हत्यांशी थेट संबंध होता आणि त्यातही या पुस्तकातून अतिशय सविस्तरपणे दाखवून देण्यात आले आहे. त्याप्रमाणे १९४८ च्या हिवाळ्यातील दुर्दैवी संध्याकाळी झालेल्या महात्मा गांधींच्या हत्येच्या कटाचे सावरकर सूत्रधार होते, ही अतिशय हानिकारक बाब आहे. अनन्यसाधारण अशा स्पष्टवक्तेपणाने थेटपणे, कठोर प्रहारांनी ए. जी. नूरानी हे अतिशय प्रभावीपणे सावरकरांच्या विरोधातील प्रकरणाची उभारणी करतात. आधुनिक भारतीय राजकारणात आणि भारताच्या जातीयवादाच्या इतिहासात स्वारस्य असलेल्या सर्वांनी माहिती आणि ऐतिहासिक तपशील यांनी समृद्ध असलेले हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
ReplyForward
|
Reviews
There are no reviews yet.