Description
सत्यशोधक हा शब्द सर्वांना परिचीत आहे. महात्मा जोतीराव फुले यांनी सत्याकरीता आपले पूर्ण आयुष्य वेचले. ते सत्याचे पुरस्कर्ते होते. त्यांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह कसा करावा, याचे वर्णन त्यांनी आपल्या ग्रंथात केले आहे. सत्यशोधक पद्धतीने किंवा विद्न्याननिष्ठ पद्धतीने विवाह कसा करावा हे आज अनेक समाज बांधवांना माहिती नाही. त्यामुळे इच्छा असूनही ते सत्यशोधक पद्धतीने विवाह करू शकत नाहीत किंवा इतरांचा विवाह लावू शकत नाहीत. त्यामुळे अशा पुस्तकाची आवश्यकता बऱ्याच वर्षापासून होती, असे म्हणायला काही हरकत नाही.
स्त्री-पुरूष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंब पोसावे आनंदाने
नित्य मुलीमुलां शाळेत घालावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यांस
सार्वभौम सत्य स्वत: आचरावे, सूखे वागवावे पंगु लोकां
अशा वर्त्तनाने सर्वा सुख द्याल, स्वत: सुखी व्हाल जोती म्हणे
Reviews
There are no reviews yet.