Description
।। संवाद – सहृदय श्रोत्यांशी ।।
विद्रोह
विद्रोह म्हणजे प्रस्थापितांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी वंचितांनी केलेले सर्वांगीण स्वातंत्र्ययुद्ध होय. विद्रोह म्हणजे आपल्या श्वासोच्छासांवरची, आपल्या नाडीच्या ठोक्यांवरची, आपल्या स्वत्वावरची, किंबहुना आपल्या एकूण अस्तित्वावरची अनिष्ट बंधने तोडणे, आपल्याला गुदमरवून टाकणारी दडपणे झुगारून देने होय…. कोणावर सूद उगवणे, कोणाचा द्वेष करणे, कोणाला त्याचा न्याय स्थानापासून खाली खेचून पायदळी तुडवणे, यासाठी हा विद्रोह नाही. हा विद्रोह आमच्या स्वत्वाच्या अविष्कारासाठी आहे. आमच्या उमलण्यावर लादण्यात आलेली बंधने तोडण्यासाठी आहे आमच्या विकासभोवती आलेली बंधने तोडण्यासाठी आहे…. आपल्यालाही बोलण्यासाठी जीभ आहे, लिहिण्यासाठी हात आहेत आणि विचार करण्यासाठी मेंदू आहे. या सगळ्यांच्या जोरावर आपली सर्जनशीलता… पणाला लावून आपणच आपले देखणे विश्व निर्माण करू या.
कुणबी – मराठा समाजाला आवाहन
केवळ प्रस्थापित ‘ जहागीरदार ‘ म्हणजे अख्खा मराठा समाज नव्हे. मराठा समाजात ‘ रंजल्या – गांजल्या ‘ लोकांची संख्या अशा प्रस्थापित मराठ्यांपेक्षा किती तरी पटींनी अधिक आहे…. आपलं संघटन आत्मविकासासाठी आणि दुबळ्यांना आधार देण्यासाठी आहे…. मराठा समाजाला दूर ठेऊन प्रबोधन यशस्वी होणार नाही…. भाषेवर प्रभुत्व प्राप्त करू या…. बौद्धिक आव्हानं स्वीकारण्यास सज्ज होऊ या…. मुलींनो, तुम्ही वडाला फेऱ्या मारण्याऐवजी संगणकाला तुमच्या भोवती फेऱ्या मारू द्या…. कुणबी पालकांनो, म्हशीला योग्य वेळी वैरण घालता, तशी ‘वैरण’ आपल्या मुलांच्या मेंदूला मिळते का, ते पहा. मुलांनो, जमिनीत दडपलेलं बी जसं चैतन्यानं सळसळून अंकुरतं आणि आकाशात झेपावतं, तशी झेप घ्या. आपण आपल्या स्वतःच्या खऱ्याखुऱ्या परंपरेचा शोध घेऊ या…. स्वतः फुलू या आणि अवघ्या मानवजातीला मधुर – मधुर बनवून टाकू या !
Reviews
There are no reviews yet.