Description
संत म्हटलं की तो आत्ममग्न व आध्यात्मिक प्रवृत्तीचा हवा, अशी समाजधारणा आहे. तुकडोजी या संतविषयक समजुतीच्या विरोधात समाजकार्य आणि राष्ट्रकार्यात व्यग्र असत. त्यामुळे त्यांना लोकांनी राष्ट्रसंत या विशेषणाने संबोधणे सुरू केले. तुकडोजींची राष्ट्रभक्तीची आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश देणारी भजने ऐकून राष्ट्रपती राजेन्द्र प्रसाद यांनीही त्यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधले. त्यामुळे त्यांच्या या नव्या रूपाला राष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त झाली. त्यांना आता केवळ तुकडोजी महाराज न म्हणता ‘राष्ट्रसंत तुकडोजी’ या नावाने सारे लोक संबोधू लागले.
Reviews
There are no reviews yet.