Description
प्रस्तुत पुरुषसूक्त या वैशिष्ट्यपूर्ण शीर्षकाच्या पुस्तकात डॉ. दिनेश वाघूंबरे यांनी गिरीश कार्नाडांच्याच ‘तलदेण्ड’ या नाटकाचा लोक सांस्कृतिक दृष्टिकोनातून चौफेर साद्यन्त परामर्श घेतला आहे.
बाराव्या शतकात कर्नाटकात धार्मिक क्षेत्रात घडवून आणलेल्या बसवेश्वरांच्या क्रांतीचे तत्कालीन समाजाधारणा, राज्यकर्ते, धर्माचार्य, भारतीय जातिव्यवस्थेचे गुंते/तिढे या सर्वांचे विश्लेषण या निमित्ताने केले आहे. कोणत्याही संस्कृतीचा प्रवास हां मानवी जीवनाच्या आदिम ते अद्यतन अवस्थेपर्यंत होताना काही महत्त्वाच्या टप्प्यांवरचे अवशेष समाजात टिकून राहतात. भारतीय समाजाच्या वाटचालीत धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा संघर्ष समन्वयाचा लढा अगदी पुरुषसूक्त कालीन वैदिकांपासून ते आजच्या मंडल आयोगापर्यंत कसा चालू आहे, याचा आंतरज्ञानशाखीय अभ्यास दृष्टिकोनातून डॉ. वाघूंबरे यांनी सम्यक शोध घेतला आहे, तो मूळातून वाचायला हवा.
Reviews
There are no reviews yet.