Description
मूळ पुस्तक इंग्रजीतून असल्यामुळे समाजवादारोहणापुढे कुंठित झालेल्या चीन, क्युबा, व्हिएतनाम व नॉर्थ कोरिया या देशांच्या जनतेला ते अर्पण केले. या अनुवादित पुस्तकाचा वाचक मराठी आहे आणि तो जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांतीच्या आव्हानापुढे कम्युनिस्ट व आंबेडकरी दोन्ही बाजूंनी कुंठित झाला आहे. बुद्धाच्या आदेशावरून दिग्नाग स्कुलने या कुंठिततेच्या सोडवणुकीची दार्शनिक, अन्वेषणात्मक, सौदर्यशास्त्रीय व तर्कशास्त्रीय पूर्वतयारी सातव्या शतकाआधीच केली होती, परंतु तिच्याकडे कम्युनिस्ट व दलित या दोन्ही बाजूंनी लक्ष न दिल्यामुळे जातवर्गसमाजाचे अरिष्ट सार्वत्रिक व तीव्रतर होत आले आहे. समाजव्यवस्था बदलणे म्हणजे क्रांती. बुद्धाने वर्णदासव्यवस्था बदलायची भारतीय इतिहासातील श्रेष्ठतम क्रांती केली. भारतीय जनतेला जातवर्गव्यवस्था बदलायची क्रांती करावी लागणार आहे. ‘स्वलक्षी ‘ दिग्नागीय मार्गाने पण तिने असवायच्या भांडवलदारी समाजोत्तर भारतीय समाजवादाची पूर्वतयारी अगोदरच करावी लागेल.
Reviews
There are no reviews yet.