Description
राजसत्ता कोणाकडे किंवा कोणाच्या ताब्यामध्ये आहे यापेक्षा ती कोणत्या विचारसरणीच्या ताब्यात आहे याला जास्त महत्त्व आहे. ही विचारसरणी जर, सर्व सामाण्यांच्या विचारांचा आदर करणारी व विद्न्यानवादी, पुरोगामीत्वाची वाहक असेल. माणसामाणसातील भेदभाव नष्ट करणारी असेल व सत्य शोधणारी असेल. तर ती कोणाच्या हाती आहे हा मुद्दाच राहणार नाही. त्यामुळे अशा राजसत्तेकडे वाटचाल करून ती हस्तगत करण्याकडे कल असला पाहिजे. तद्वतच धर्मसत्ता व प्रचार – प्रसार सत्ता हा सुद्धा समाजोद्धाराचा महत्त्वपूर्ण दुवा आहे. धर्मसत्ता व प्रचार – प्रसार सत्ता हा सर्व सामान्य जनतेपासून फार दूर असलेला मुद्दा होता. मात्र विविध जागृत संत, प्रबोधनकार, सत्यशोधक विचारवंत व संघटनांनी तथा चळवळींनी याबाबत, महत्त्वपूर्ण, जनजागृती करून लोकांना जागृत केलं आहे.
Reviews
There are no reviews yet.