नव्या युगाचे प्रवर्तक क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले

135.00

50 in stock

पुस्तकाचे नाव नव्या युगाचे प्रवर्तक क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले
लेखक मोगल जाधव
ISBN 978-93-47222-32-0
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १२०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

महाराष्ट्र हे भारतातील एक प्रगत राज्य आहे. कारण महाराष्ट्राला केवळ राजकीय, आर्थिक इतिहासाचा उज्ज्वल वारसा मिळालेला आहे, असे नाही तर सामाजिक सुधारणांची उज्ज्वल परंपराही लाभली आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या अखंडीत परंपरेत अनेक संतकवी, सामाजिक, राजकीय विचारवंत यांचा सहभाग आहे. त्यातही राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या त्रयींच्या विचारांचे महत्त्व खूप आहे. आजचा आधुनिक महाराष्ट्र घडवण्यात त्यांचे फार मोलाचे योगदान आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रप्रणालीच्या प्रभावाखाली हरकलेल्या नवीन पिढीलाही या तीन महात्म्यांच्या नावाचा पूर्ण विसर पडलेला नाही, हे खरे असले तरी त्यांच्या वैचारिक श्रीमंतीचा परिचय करून देणाऱ्या त्यांच्या साहित्यसंपदेकडे नवीन पिढीचे दुर्लक्ष होत आहे.

श्री. मोगल जाधव यांच्या ग्रंथमालेतील या पुस्तकाचे महत्त्व म्हणूनच मोलाचे आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या साहित्यसंपदेची ओळख त्यांनी थोडक्या शब्दांत पण रोचक, वाचनीय पद्धतीने करून दिली आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर महात्मा जोतीराव फुल्यांचे लेखन मुळातून वाचण्यासाठी आजची तरुण पीढ़ी पुन्हा एकदा उद्युक्त होईल. भेदाभेदाचे राजकारण मिटले आहे असे वरवर वाटत असले तरी ते पूर्णपणे मिटलेले नाही. ते तसे मिटवता यावे म्हणून तरुण पिढी पुन्हा एकदा जागरूकतेने कामाला लागेल, अशी आशा वाटते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नव्या युगाचे प्रवर्तक क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले”

Your email address will not be published. Required fields are marked *