Description
“भगवंतास मी सुखात असताना पाहिले आहे व आजारी असताना पाहिले आहे. भगवंताच्या आजाराने माझे शरीर शिशासारखे जड झाले आहे. मला दिशाभ्रम झाला आहे. मला धर्मही सुचत नाही, परंतु त्यातल्या त्यात मला एवढे समाधान वाटते की, मिक्षु संघाविषयी काही तरी सांगितल्याशिवाय भगवंताचे परिनिर्वाण व्हायचे नाही.” भगवान बुद्धांनी उत्तर दिले, “आनंदा! मिक्षू संघास मजपासून काय हवे आहे ? आनंदा मी आत बाहेर काही न ठेवता धर्मोपदेश केला आहे. त्यात तथागताने आचार्यसूति मुळीच ठेवली नाही. तर मग आनंदा, तथागत निक्षूविषयी काय सांगणार? तेव्हा आनंदा, तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा! पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित राहू नका! स्वतःवरच विश्वास ठेवा. दुसऱ्या कोणाला अंकीत होऊ नका! सत्याला धरुन राहा! सत्याचाच आश्रय करा! व दुसऱ्या कोणाला शरण जावू नका!” मी देखील बुद्धाच्याच शब्दांचा आश्रय करुन तुम्हाला असा निरोप देतो की, “तुम्ही आपले आधार व्हा! तुम्हीच स्वतःच्या बुद्धीला शरण जा ! दुसऱ्या कोणाचाही उपदेश ऐकू नका! दुसऱ्या कोणालाही वश होऊ नका! सत्याचा आधार घ्या! सत्यास शरण जा ! दुसऱ्या कशाला ही शरण जाऊ नको!” हा भगवान बुद्धाचा उपदेश तुम्ही या प्रसंगी ध्यानात ठेवाल तर माझी खात्री आहे की तुमचा निर्णय चुकीचा होणार नाही.
Reviews
There are no reviews yet.