मिलिंद प्रश्न

950.00

Out of stock

पुस्तकाचे नाव मिलिंद प्रश्न
लेखक आचार्य सूर्यकांत भगत
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ५२६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ७५० ग्रॅम

Description

 

मिलिंद हा एका बॅक्ट्रियाचा ग्रीक राजा होता. त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमेंड होती. त्याला असे वाटे की, ग्रीक सारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेही सापडावयाचे नाहीत. आपल्या बुद्धीमत्तेला मिलिंदला गर्व चढला होता. तो सर्वांना वाद विवादाने आव्हान देत असे. त्याने जगाला आव्हान दिले. त्याला एकदा वाटले की आपण एखाद्या बौद्ध भिक्खु बरोबर वाद करावा. पण त्याच्याबरोबर वाद करण्यास कोणीही  तयार झाला नाही. तसा मिलिंद हा काही तत्त्वज्ञानी नव्हता.  किंवा गाढा विद्वानही नव्हता. त्याला राज्यकारभार कसा चालवावा हेच माहीत नव्हते. पण अशा मिलिंद बरोबर बुद्धिवाद करण्यास कोणीही तयार होईना. ह्याची बौद्धांना लाज वाटली व वाईटही वाटले. नंतर महान प्रयासाने त्यांनी नागसेन भिक्खुला तयार केले. मिलिंदाचे आव्हान आपण स्विकारले पाहिजे असा नागसेनाने निश्चय केला. मग त्यात यश येवो किंवा अपयश येवो.

नागसेन हा ब्राह्मण होता. वयाच्या सातव्या वर्षी त्याने आपल्या आई-बापाचे घर सोडले होते. त्याने विद्येच्या, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी अतिशय कष्ट घेतले. तो अत्यंत विद्वान होता. नागसेनाने भिक्खुचा आग्रह मान्य केला. नंतर मिलिंद व नागसेन यांचा वादविवाद झाला. त्यांचा वादविवाद कैक दिवस चालू होता. त्या वादविवादाचे एक पुस्तक तयार झाले. त्या पुस्तकाला पाली भाषेत ‘मिलिंद पन्हो’ असे नाव आहे. या पुस्तकाचे मराठीत भाषांतर ‘मिलिंद प्रश्न’ असे आहे. या पुस्तकाचे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावे. अशी माझी इच्छा आहे. शिक्षकांच्या अंगी व विद्यार्थ्यांच्या अंगी काय गुण असावेत हे त्यात सांगितले आहे.

वादविवादात मिलिंद हरला. त्याचा पराजय झाला. तो बुद्धधर्मी झाला. पण मिलिंद हरला व बुद्ध झाला म्हणून मी हे नाव दिलेले नाही, तर मिलिंद हा मला त्याच्या INTELLECTUAL HONESTY बद्दल प्रिय वाटतो. त्याचा हा आदर्श सर्वांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवावा म्हणून हे नाव दिलेले आहे. हे आदर्शभूत असेच आहे असे माझे मत आहे. उत्तम विद्यार्थी म्हणून मिलिंद व उत्तम शिक्षक म्हणून नागसेन हे आदर्श आहेत. शिक्षण संस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्याने केवळ पैशाची देणगी दिली म्हणून त्याचे नाव शिक्षण संस्थेला देणे हे अत्यंत अनुचित होय. मी या संस्थेसाठी पुष्कळ नुकसान सोसले, पण कोण्या व्यक्तीचे नाव दिले नाही. तसे मलासुद्धा आदर्श नाव आहे. पण मला मिलिंदचा आदर्श आपल्यासमोर ठेवावयाचा आहे. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मिलिंद प्रश्न”

Your email address will not be published. Required fields are marked *