Description
मनुस्मृतीच्या समर्थकांची ही तथाकथित संस्कृती म्हणजे राष्ट्रीय आपत्ती आहे. कारण, स्वतः मनुस्मृती हाच भारतीय संस्कृतीवरचा कलंक आहे. मनुस्मृतीच्या समर्थकांना मी अंतःकरणापासून आवाहन करू इच्छितो –
या! एकमेकांच्या हातात हात घालून हा कलंक पुसून टाकू या. शोषकांचा अहंगंड आणि शोषितांचा न्यूनगंड या दोहोंचे विसर्जन करून एक विवेकी, सहकार्यशील, संवेदनशील आणि प्रतिभाशाली समाज निर्माण करू या.
भारतीय समाजाच्या हृदयातील मनुस्मृतिरूपी काटा काढून टाकू या. या मनुस्मृतीमुळे कोमेजलेली, करपलेली मने पुन्हा रसरशीत करू या. ताजी टवटवीत करू या.

Reviews
There are no reviews yet.