महात्मा फुले साहित्य आणि चळवळ

200.00

Out of stock

पुस्तकाचे नाव महात्मा फुले साहित्य आणि चळवळ
लेखक हरी नरके
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ४६५
आकार ६ * ९ इंच
वजन ८२७ ग्रॅम

Description

१८९७ साल उजाडले तेच प्लेगचे थैमान घेऊन पुणे परिसरात दररोज शेकडो माणसे मरू लागली. सरकारने रँड या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचे काम हाती घेतले. सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतले आणि ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालावयाला लावला. त्या स्वतः आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत. त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महार वस्तीत पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या. मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ रोजी रात्री ९ वाजता त्यांचे प्लेगमुळे निधन झाले.
सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. त्यांच्यानंतर एकाकी डॉ. यशवंत सैरभैर झाले. हाँगकाँग, आफ्रिका, चीन येथे त्यांनी लष्करात नोकरी केली. १३ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची पत्नी चंद्रभागा आणि मुलगी सोनी ऊर्फ लक्ष्मी यांच्या अनाथपणाला पारावार राहिला नाही. त्यांनी सर्वप्रथम जोतीरावांची सगळी पुस्तके रद्दीत विकली. त्यानंतर भांडीकुंडी विकून गुजराण केली आणि शेवटी २८ ऑक्टोबर १९१० रोजी जोतीराव सावित्रीबाईंचे ऐतिहासिक घर त्यांनी अवघ्या शंभर रुपयांना मारुती कृष्णाजी देडगे यांना विकले. बाई मुलीसह रस्त्यावर आल्या. बेवारस म्हणून रामेश्वराच्या दारात वारल्या! त्यांची अंत्ययात्रा बेवारस म्हणून नगरपालिकेने केली.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महात्मा फुले साहित्य आणि चळवळ”

Your email address will not be published. Required fields are marked *