Description
महात्मा गांधींनी श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन व आत्मसन्मान बहाल करणाऱ्या स्वदेशीच्या चळवळीमध्ये सूतकताई व खादीला महत्व दिले. लवकरच ही खादी चळवळ स्वातंत्र्य चळवळीचा अविभाज्य भाग बनून संपूर्ण देशभर पसरली. खानदेशही त्याला अपवाद नव्हता. ही खादी चळवळ भौगोलिकदृष्टया कृषीप्रधान, सामाजिकदृष्ट्या विविधतेने नटलेल्या आणि राजकीयदृष्टया सजग असलेल्या प्राचीन ऐतिहासिक, सांस्कृतिक व सलग आणि समृद्ध इतिहास परंपरा लाभलेल्या खानदेशमध्ये कशा पद्धतीने रुजली व वाढली याचे संदर्भासह समग्र चित्रण प्रस्तुत ग्रंथातून पहायला मिळते.
प्रस्तुत ग्रंथात लेखकाने खानदेशच्या स्थानिक स्वातंत्र्य चळवळीची प्रादेशिक व राष्ट्रीय चळवळीशी यथोचित सांगड घालून खानदेशातील खादीचा इतिहास, खादी कार्यकर्त्यांचे व खादी संस्थांचे कार्य, खादी प्रचार प्रसारासाठी त्यांनी उघडलेल्या मोहिमा, घेतलेले मेळावे, प्रशिक्षण वर्ग या सर्वांचा खानदेशातील समाज जीवनातील एकात्मतेवर झालेला परिणाम यांचे विस्तृत चित्रण केले आहे. तसेच लेखकाने या ग्रंथ लिखाणासाठी दुर्मिळ प्राथमिक स्त्रोत, संदर्भग्रंथ आणि स्थानिक जाणकार व्यक्तींच्या मुलाखतींचा पुरेपूर उपयोग करून ऐतिहासिक तत्थ्यांची शास्त्रीय मांडणी केल्यामुळे ग्रंथाला विश्वासाहर्ता प्राप्त झाली आहे. खादीच्या धाग्यांतून विणलेला ख़ानदेशच्या मातीतील सत्य घटनांचा जिवंत इतिहास स्वातंत्र्यप्राप्तीच्या अनेक दशकानंतर पहिल्या प्रथमच या ग्रंथ रुपाने इतिहास अभ्यासक, संशोधक व सुज्ञ वाचकांपर्यंत पोहोचत असल्याने जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील अनेक अज्ञात पैलू उलगडणारा ” खानदेशातील खादी चळवळ ” हा ग्रंथ ख़ानदेशच्या संदर्भग्रंथात मोलाची भर घालणारा ठरेल.
Reviews
There are no reviews yet.