खान अब्दुल गफ्फार खान

140.00

Out of stock

पुस्तकाचे नाव खान अब्दुल गफ्फार खान
लेखक श्याम पाखरे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ८८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १५६ ग्रॅम

Description

एका खांद्यावर बंदूक व दुसऱ्या खांद्यावर तंतुवाद्य ही होती पठाणांची ओळख. वायव्य सरहद्द प्रांताचे हे रहिवासी अत्यंत शूर, धाडसी, तसेच आक्रमकही होते. दोन घराण्यांतील सुडाची परंपरा पिढ्यानपिढ्या चालविणे, त्यात अनेकांच्या आयुष्याची आहुती देणे याचा त्यांना अभिमान वाटत असे. हिंसेने व्यापलेले दुर्गम प्रदेशातील कठीण आयुष्य, मुल्ला-मौलवींच्या रूढिग्रस्ततेचा प्रभाव आणि इंग्रजांची जुलमी राजवट. या वातावरणातून एक बलदंड, निर्भय तरुण नेता जन्मला, ज्याला ‘अहिंसा हे वीराचे भूषण आहे’ या गांधीवचनाचा अर्थ नेमका उमगला होता. ‘हिंसा हा खुदाचा मजहब नाही, मोहब्बत हा खुदाचा मजहब आहे’ हे त्याने आपल्या वतनवासीयांना पटवून दिले. ‘खुदाई खिदमतगार’, म्हणजे ईश्वराच्या अहिंसक सेवकांची फौज उभारली. स्वातंत्र्यासाठी जनजागरण, तसेच गावागावांत रचनात्मक कार्य सुरू केले. हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी आपले प्राण पणाला लावले. फाळणीला अखेरपर्यंत विरोध करण्यात गांधींची साथ दिली ती या सरहद्द गांधींनी. पाकिस्तानात राहूनही धर्मांधतेला, हिंसक राजकारणाला विरोध करणारा हा पठाण आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात एकाकी पडला. भारत-पाकिस्तान, हिंदू-मुसलमान कोणालाही त्यांचे ‘निखळ माणूस’ असणे परवडले नाही. आजच्या धर्मांधतेने काळवंडलेल्या काळात अहिंसेच्या शापित उपासकाची ही प्रेरणादायी कहाणी आपण वाचलीच पाहिजे.

‘गांधी-१५०’च्या निमित्ताने युवा पिढीला नवभारताच्या निर्मात्यांची तोंडओळख करून देणाऱ्या ‘गांधीजन चरित्रमालेतील’ हे एक महत्त्वाचे पुष्प.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “खान अब्दुल गफ्फार खान”

Your email address will not be published. Required fields are marked *