कस्तुरबा

150.00

Out of stock

पुस्तकाचे नाव कस्तुरबा
लेखक सुनंदा  मोहनी
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १०४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम

Description

कस्तुरबांचे हे चरित्र म्हणजे मोहनदास व कस्तुर ह्या दोघांची जोडकथाच आहे; दोन रंगांच्या फुलांच्या दोन स्वतंत्र माळा एकत्र गुंफून केलेल्या सुंदर दुपदरी माळेसारखी! एका शांत, सौम्य, सात्त्विक वृत्तीच्या अशिक्षित स्त्रीचे आयुष्य एका लोकविलक्षण,कलंदर माणसाशी बांधले जाते आणि त्याला समजून घेत, कधी त्याच्याशी भांडत त्याच्यासोबत तीही वेगाने बदलते. पण आपल्या अंतर्मनाला पटल्याशिवाय ती कोणाचेच, अगदी महात्मा गणल्या गेलेल्या आपल्या प्राणप्रिय नवऱ्याचेही ऐकत नाही. साऱ्या विश्वाला आपले. म्हणणारा ध्येयवादी नवरा आणि त्याच्या सावलीतून दूर होऊन आपला अवकाश शोधू पाहणारा मनस्वी, पण दुबळा मुलगा, ह्यांच्या कात्रीत तिचा जीव सापडतो. मात्र आपण निव्वळ चार नव्हे, तर चाळीस कोटी मुलांची माता आहोत, हे भान आल्यावर ती इतकी प्रगल्भ होत जाते, की खुद्द गांधीजींना ‘बा माझ्या जीवनात आली नसती तर मी महात्माही झालो नसतो. ती माझी सत्याग्रहातील गुरू आहे’ हे सांगावे लागते. आश्रमाचा कैदखाना होऊ न देता त्याला घरपण देणारी, आंदोलनात स्त्रियांचे नेतृत्व करणारी, नवन्यावर रुसणारी, रागावणारी… कस्तुरबांची कितीतरी मनोज्ञ रूपे ह्या पुस्तकात रेखाटलेली आहेत.

गांधी- १५०च्या निमित्ताने बुवा पिढीला नवभारताच्या निर्मात्यांची तोंडओळख करून देणाऱ्या ‘गांधीजन बालचरित्रमाले तील हे एक महत्त्वाचे पुष्प.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कस्तुरबा”

Your email address will not be published. Required fields are marked *