Description
या 1930-31 या वर्षाच्या जनतेत जातिव्यवस्थेविरोधातील वैचारिक टिपणे, घटना, त्याचे विश्लेषण, आंतरराष्ट्रीय राजकारण, स्वातंत्र्य चळवळ, गांधी कॉंग्रेस, सावरकर, हिंदू महासभेच्या जातिअंताच्या कल्पना, कामगार प्रश्न, चळवळी, दूसरी गोलमेज परिषद् वृत्तांत, आंबेडकरांची भूमिका, अखिल भारतीय वर्णाश्रम स्वराज्य परिषद् जळगाव व अस्पृश्यांचा सत्याग्रह व त्यावरील मिमांसा, महाड प्रकरणाचा निकाल, अस्पृश्यता, जनता व सरकार यांची भूमिका, विलायतेहुन आंबेडकरांनी लिहिलेली पत्रे, आंबेडकरांच्या दौऱ्याची सविस्तर व अधिकृत माहिती, ऐतिहासिक नाशिक सत्याग्रहाची हकिगत, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची फाशी, नवजवान भारत सभेचा कार्यक्रम, कोकण शेतकरी संप, मुस्लिम ऑल पार्टीज कॉन्फरन्स वृत्तांत व त्यावरील ‘प्रासंगिक विचार’, स्पेनमधील राज्यक्रांती, कोकण प्रांत चांभार परिषद्, अ. भा. बहिष्कृत पुढाऱ्यांची परिषद्, स्त्री वर्गाचे मूलभूत हक्क, सहभोजन, वेळोवेळी बाबासाहेबांनी दिलेली भाषणे, पुस्तक परिचय, इतर पत्रांवरील भाष्य – टिका टिप्पणी, गांधी – आंबेडकर मुलाखत, मुखेड प्रकरण इत्यादी विषयाची नोंद आपल्या विश्लेषणासह जनतेत घेतली गेली आहे. या साऱ्या गोष्टींचा विचार करता तत्कालीन घडामोडीचा आरसा जनतेतून आपणास मिळतो. यादृष्टीने हा ऐवज (खंड) महत्त्वाचा ठरतो.
जनतेचे दूसरे वैशिष्ट्य म्हणजे वृत्तपत्राचा वापर संघटन, परिषदा यांच्या आयोजनासाठी केलेला आहे. त्याच बरोबर बाबासाहेबांबद्दल जाणीवपूर्वक उत्पन्न केला गेलेला भ्रम व अपप्रचार याचा समाचार घेवून तो दूर करण्यासाठी जनता पुढे असलेली जाणवते. तसेच एक व्यक्ती व तिची चळवळ याची पाठराखन करणारे हे पाहिले पाक्षिक आहे असे म्हणावे लागेला. एक बाजू घेऊन लेखन हेही जनतेचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. कामगार व संपाच्यासंबंधी केलेले लेखन पाहता तत्कालीन पत्रातून अशी भूमिका दिसत नाही. सुधारकाबाबतही जनता रोखठोक भूमिका घेते व त्यामुळेच सवर्णाच्या अर्धवट भूमिकांची ( सावरकर, गांधी) ती परखड चिकित्सा करते व प्रतिस्पर्धी पत्रांवर रोखठोक टीका करताना दिसते. आणखी एका वैशिष्ट्याचा उल्लेख येथे करणे आवश्यक आहे. पुरोगामी व आधुनिक विचारांच्या सवर्णांचे लेखन जनता आवर्जून प्रसिद्द करते.
Reviews
There are no reviews yet.