Description
अनेक खोटेनाटे स्वार्थीपणाचे आधार दाखवून ब्राह्मण लोक ब्राह्मणेत्तर समाजाची दिशाभूल करून त्यांचे चित्त व वित्त हरण करितात आणि सदरील ‘इहप्रिय’ मंत्रार्थातील ”माझ्या देहाशी तू आपला देह भिडीव” हें नवरदेवाचे देहधर्माचे – गुप्त वाक्य उच्चारल्याच्या योगाने ब्राह्मण पुरोहित ब्राह्मणेतरांच्या हजारो मुलींचा पति बनतो! तरीही ज्या ब्राह्मणेतरांचे पित्त खवळून जाट नाही व लग्नासारख्या मंगल प्रसंगांतून भटपुरोहितांची हकालपट्टी करीत नाही तो ब्राह्मणेतर नादान म्हटला पाहिजे. कन्यापितांनो, सावध व्हा! आता तरी डोळे उघड़ा आणि लग्नप्रसंगांतील सर्वच मंत्रार्थांनी भट आपल्या मुलीस काय म्हणतो ते पहा !! तुम्ही आजपर्यंत भट जोशावर भोळी अंधश्रद्धा ठेविली म्हणूनच असा विपरीत परिणाम झाला!!! तुम्ही जर या धर्मघातकी उर्फ धर्मबिघाडू भटपुरोहितांवर विश्वास ठेविला नसता व आपल्या हिंदू धर्मभांडारगृहाच्या किल्ल्या आपल्याच स्वाधीन ठेविल्या असत्या तर आपल्या पवित्र हिंदू धर्मात व लग्नासारख्या मंगल प्रसंगांत अशा तऱ्हेची वाईट घाण मुळीच झाली नसती. अस्तु.
लग्नासारख्या परम मंगल प्रसंगांत ब्राह्मण पुरोहित कोणत्या प्रकारचा अमंगलपणा करितात यांचे हूबहुब चित्र या पुस्तकांत रेखांटून ते आम्ही आपणासमोर ठेवून, या भटपुरोहितांच्या पाजी हृदयाची ओळख आपणांस करून दिली आहे. तरी बांधवांनो ! अंधश्रद्धा व धर्मभोळेपणा लवकर सोडा, आणि लग्नात होणाऱ्या होमांतील अग्निनारायणाच्या साक्षीने ”आजपासून मी माझ्या मुलामुलींच्या लग्नकार्यात ब्राह्मणास बोलावणार नाही व त्यांच्या हातून लग्न लावून घेणार नाही, तसेच श्राद्ध, देवपूजा इत्यादी कोणतीही धर्मविधी ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. ” अशी शपथ घ्या, अशी आपल्या पवित्र चरणांवर मस्तक ठेवून व दोन्ही कर जोडून आपणांस माझी अत्याग्रहाची पण नम्र प्रार्थना आहे.

Reviews
There are no reviews yet.