बौद्ध धर्म आणि काश्मीर

₹180.00

1 in stock

पुस्तकाचे नाव बौद्ध धर्म आणि काश्मीर
लेखक सुरेश खाडे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या --
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन --

Description

बौद्ध धर्म हा मोठ्या प्रमाणात व सोळाशे वर्षांहून अधिक काळ काश्मीर मध्ये होता हे आपण पाहिले. सम्राट अशोकाच्या सांगण्यावरून माझंतिक ईसवी सन पूर्व ३०० च्या सुमारास काश्मीरमध्ये आला. त्याने तेथे धम्माच्या थेरवाद पंथाची स्थापना केली; परंतु लवकरच त्याचे रूपांतर  झाले. पहिल्या शतकात काश्मीरमध्ये थेरवादाला ओहोटी लागली. सर्वास्तिवाद हा थेरवादापेक्षा फार वेगळा नव्हता; तरीही मूळ शिकवणुकीपासून काही प्रमाणात त्याचे विचलन झाले होते. बौद्धधर्म काश्मीरमध्ये विविध स्वरुपात तेराव्या शतकापर्यंत टिकला – म्हणजे जवळजवळ सोळाशे वर्षे. ह्या दीर्घ काळात मोठ्या प्रमाणावर विहार आणि स्तूप बांधले गेले; त्यांचे अस्तित्व आजही भग्न अवषेशाच्या रूपाने दिसून येते. काश्मीरमध्ये बौद्ध धर्म कैसा होता, किती विहार व स्तूप होते इत्यादी बाबींचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. एकेकाळी काश्मीर हे जणू बौद्ध धर्मियांचे केंद्रस्थान होते. आज मात्र बौद्धधर्म तेथून लोप पावला आहे. तो पुन्हा पूर्वीप्रमाणे तेथे स्थिरावेल, असे मानणे अवास्तव ठरेल. परंतु ज्या कारणांमुळे काश्मीरमध्ये बौद्धधर्माचा ऱ्हास झाला, त्यातून बौद्धधर्मीय – विशेषत: महाराष्ट्रातील बौद्ध महत्त्वाचा धडा घेऊ शकतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बौद्ध धर्म आणि काश्मीर”

Your email address will not be published. Required fields are marked *