Description
या ग्रंथांमध्ये भगवंतांच्या विविध अनुयायांचा परिचय देतांनाच काही स्त्री-पुरूष उपासकांचाही परिचय आणि तथागतांचा त्यांच्याशी झालेला संवाद यांच्या कथा दिल्या आहेत. या परिचयातून सामान्य उपासकांनीही कोणती आचार संहिता पाळल्यास, आणि कोणती जीवनमूल्ये जोपासल्यास त्यांचे जीवन आणि समाजजीवन सुखी होऊ शकते, सुखी राहू शकते, हे स्पष्ट होते.
बुद्धधम्माचा हेतूच मुळी मानवाचे, मानवी समाजाचे जीवन सुख, समृद्धी, शांती आणि ज्ञानसाधना यांनी युक्त असावे असा आहे. दु:खमुक्ती हे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अतिमानवी अंधश्रद्धांच्या आहारी समाज जाऊ नये यासाठी धम्म, भिक्खू संघ, सामान्य उपासक आणि समाज यातील संबंध स्पष्ट होणे आवश्यक आहे.

Reviews
There are no reviews yet.