Description
लोकशाही राष्ट्रातील राज्यघटनेची सार्वभौमता ही त्या राष्ट्रातील नागरिकांच्याकडे असते. मग ती लोकशाही कोणत्याही पद्धतीची असो. म्हणून कोणत्याही राष्ट्राच्या घटनेत काही बदल घडून येत असतील किंवा घटना बदल होत असेल तर त्याची सविस्तर माहिती प्रत्येक नागरिकाला मिळाली पाहिजे. भारतीय राज्यघटना ही लोकांनी स्वत:च स्वत:ला अर्पण करून घेतलेली आहे. तेव्हा भारतीय घटनेसंदर्भात काही बदल करायचे असतील तर ज्या लोकांनी ही घटना राष्ट्राला दिलेली आहे, त्यांनाच या महत्त्वाच्या प्रश्नावरती विचार करू दया आणि म्हणूनच, जनतेला राज्यघटनेत पुनर्विलोकना संदर्भात सविस्तर माहिती देण्याच्या दृष्टीकोनातून हा लेखन प्रपंच.
प्रस्तुत पुस्तिकेत लोकशाही, संसदीय प्रणाली, अध्यक्षीय प्रणाली, राज्यघटना पुनर्विलोकनाची पार्श्वभूमी, पुनर्विलोकना संदर्भात भारतीय जनमत, राज्यघटना पुनर्विलोकनाचा तुलनात्मक अभ्यास, घटनादुरुस्ती, घटनेची वैशिष्ट्ये या विषयावरती चर्चा केलेली आहे.

Reviews
There are no reviews yet.