धम्म आपला एकमेव तारक

₹180.00

1 in stock

पुस्तकाचे नाव धम्म आपला एकमेव तारक
लेखक डी. डी. बंदिष्टे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २४३
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २२० ग्रॅम

Description

बुद्ध भलेही प्राचीन भारतात झालेले असोत, तरीसुद्धा सगळ्या लेखकांनी त्यांच्याबद्द्ल एक गोष्ट मान्य केली आहे की, जीवनातील समस्यांकडे पाहण्याचा बुद्धांचा दृष्टिकोन बुद्धिवादी होता. लौकिक जगातील घटनांचे स्पष्टीकरण लौकिक जगातील घटनांच्या आधाराने देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी ईश्वर व धर्मग्रंथांचे प्रामाण्य नाकारले व आपल्या बुद्धीचेच म्हणणे ऐकण्याचा सल्ला व प्रेरणा सगळ्यांना दिली. ते तर हे सुद्धा म्हणायचे की, स्वत: बुद्धांचेसुद्धा म्हणणे लोकांनी नीट तपासून पाहावे व जेव्हा त्यांना ते पटेल, तेव्हाच त्यांनी ते स्वीकारावे. बुद्ध जे काही सांगायचे, त्याचे ते स्वत: मूर्तिमंत पुतळे होते. परंतु दुर्भागयाने बुद्धांची ही बुद्धिवादी भूमिका त्यांच्यानंतर येणाऱ्या टिकाकारांनी व विविध बौद्ध संप्रदायांनी पूर्णपणे बुडविली किंवा निदान ती सौम्य तरी केलीच. हे असे घडले ह्याचे कारण असे की, स्वत: बुद्धांनी काहीच लिहिले नाही व त्यांच्या शिष्यांनी बुद्धांची शिकवण तशीच ग्रहण केली, जशी त्यांना ती समजली; व हेच प्रत्येक पिढीमध्ये होत गेले. परिणाम असा झाला आहे की, बुद्धांच्या बुद्धिवादापासून त्यांचे शिष्य खूप दूर भरकटले. एक गोष्ट आणखी झाली की, बौद्ध धर्म हा भारताच्या उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्चिम दिशांकडल्या अनेक देशांत पसरला. दळणवळणाची साधने नव्हती; परिणाम असा झाला की, प्रत्येक देशातल्या विविध चालीरीती बौद्धधर्मात आल्या. निरनिराळ्या देशातील स्थानीय गोष्टी त्यात आल्या. बौद्धधर्म वेगवेगळ्या प्रकारचासुद्धा झाला. मंदिरे, मूर्तिपूजा, उत्सव, तीर्थयात्रा, नवस इत्यादी प्रकारच्या कितीतरी गोष्टी त्यात आल्या. अशा ह्या झालेल्या दुर्भाग्यपूर्ण अवनतीच्या संदर्भात स्वत: बुद्धांनी काय सांगितले होते, ते पुन्हा लोकांसमोर मांडणे आवश्यक झाले आहे व नेमका हा एक उद्देश ह्या पुस्तकाचा आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “धम्म आपला एकमेव तारक”

Your email address will not be published. Required fields are marked *