Description
रायबहादुर पंडित गौरीशंकर हीराचंद ओझा ह्यांच्या प्राचीन भारतीय लिपिमाला ह्या अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाचे हे लक्ष्मीनारायण भारतीय ह्यांनी केलेले मराठी भाषांतर आहे. सदरहू ग्रंथ हा लिपिंच्या संदर्भात मूलभूत संशोधन आपल्यासमोर विस्तृतपणे मांडणारा असून त्यात अर्वाचिन भारतीय लिपींची मूळ लिपी नक्की कोणती, तिची निर्मिती कोणी व कशी केली, तिच्या आणि इतरही लिपींचा विकास कसकसा होत गेला असा अवघा लेखाजोखा शिलालेख, ताम्रपत्रादी आधारांचे यथोचित दाखले देऊन मांडला आहे. ब्राह्मी ही भारतीय भाषांची मूळ लिपी आणि द्रविड़ लिपींसहित इतर सगळ्या लिपी ब्राह्मीपासूनच निर्माण झाल्या आणि ह्या लिपि आणि आकडे ह्यांचे निर्मातेही भारतीय विद्वानच होते, असे ओझांनी ह्या ग्रंथात सिद्ध केले आहे. हा ग्रंथ मूलभूत संशोधनाचा नमुनादर्श म्हणावा असाच आहे.
Reviews
There are no reviews yet.