Description
प्रस्तुत पुस्तकात उत्तर मराठेशाहीतीला विलासी जीवनाचा विचार करण्यात आला आहे. शाहूच्या राजवटीपासून महाराष्ट्रात एका वेगळ्या जीवनशैलीच्या छटा दिसतात. त्या वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शाहूच्या पेशव्यांनी उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात बऱ्याच स्वाऱ्या केल्या. त्या योगे महाराष्ट्रातील काही लोकांचा संबंध उत्तरेतील आणि दक्षिणेतील संस्कृतीशी येऊ लागला. त्यातच नवनवीन प्रांतांच्या उपलब्धतेमुले थोडीफार सुबत्ता लाभली. यापूर्वी शिवाजीच्या वेळच्या स्वाऱ्या बहुतांशी महाराष्ट्रापुरत्या (सुरत किंवा कर्नाटक सोडल्यास) मर्यादित होत्या. त्यामुळे शिवकाळात महाराष्ट्राचा संपर्क तसा बाहेरच्या विलासी जीवनाशली विशेष आला नाही. शाहूच्या बाबतीत असे म्हणता येते की, लहानपणापासून अनेक वर्ष मुघलांच्या छावनीत वास्तव्य केल्यामुळे शाहूचा संपर्क मुघल जीवनाशीच अधिक आला. अर्थात मुघल आणि राजपूत राजवटीत दिसून येणाऱ्या विलासी जीवनाच्या तुलनेत महाराष्ट्रात या कालखंडात प्रवेशलेली विलासी जीवनशैली अतिशय कमी प्रमाणात होती हे खरे, विलासाच्या विविध अंगावर (जडजवाहीर खरेदी करने, नर्तकी बाळगणे, अफगानिस्तानातून विविध फळझाडे, फूलझाडे मागविणे इत्यादी ) मुघल घराण्यामध्ये जेवढा खर्च होत असे त्या मानाने उत्तर मराठेशाहीतील खर्च कमीच म्हणायला हवा. तरीही विशेषत: मुघलांच्या संयोगाने महाराष्ट्रात हा जो प्रवाह आला, त्यामुळे येथेही उत्तरेतील सधनतेची आणि विलासाची एक प्रतिकृती निर्माण होऊ लागली असे दिसते.
Reviews
There are no reviews yet.