Description
”त्यावेळचा उठाव म्हणजे एक प्रचंड राजकीय खळबळ होती. तिचा हिंदी मनावर कायमचा ठसा उठलेला आहे. १८५७ हे वर्ष म्हणजे एका नव्या कालखंडाचीच सुरवात असून तो कालखंड १९४७ मध्ये सत्तांतर झाल्यानंतरच संपला. ती प्रतिकार चळवळ दडपण्यात आली त्याला ब्रिटिशांची यांत्रिक शक्ती व शिस्त ही जशी कारणीभूत होती तशीच पुढाऱ्यांची सदोष आणि फुटीर वृत्ती, वैयक्तिक हेवेदावे आणि एकूण हिंदी बाजूकडील कारस्थान ही ही कारणीभूत होती.”
”जातीय भेद तय झगड्यात नव्हते. राजे, जमीनदार आणि शिपाई दोन्ही बाजूंनी लढले. या लढ्यावरून आपण असा बोध घेतला पाहिजे की देशाचा पराभव बाह्य आक्रमनामुळे झाला नसून अंतस्थ कारणामुळेच आपणाला हार मानावी लागली. आपल्या एकीच्या आड धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक भेद हेच येत असून नुसते स्वातंत्र्य आले म्हणजे सर्व काही झाले असे नव्हे. देश म्हणजे प्राचीन अवशेषांचे प्रदर्शन नाही आणि पाटबंधारे किंवा यांत्रिक प्रगती, विद्युत उत्पादन या गोष्टी लाखो लोकांना अन्न पुरविण्यासाठी जरूर असल्यातरी त्यामुळे एखादा देश मोठा होत नाही. सरकारे येतात, जातात आणि राष्ट्रे आपला चेहरा मोहरा बदलतात अथवा नष्ट होतात.”

Reviews
There are no reviews yet.