मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान

720.00

10 in stock

पुस्तकाचे नाव मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान
लेखक पद्माकर गोरे, पांडुरंग बलकवडे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या २४०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ९८० ग्रॅम

Description

शिवचरित्रात असे काही घडले. महाराजांच्या महापराक्रमाला त्यांच्या साथीदारांची साथ लाभुन स्वराज्य उभे राहिले व महाराज काळाच्या पडद्याआड गेल्यावर त्यास संरक्षण व संवर्धन करायचे  कामा याच त्यांच्या  सहकार्यांनी व सहकाऱ्यांच्या पुढील पिढ्यांनी इमाने – इतबारे केले. होय, मराठ्यांच्या इतिहासात अशी काही घराणी आहेत की, जी स्वराज्याच्या उभारणीपासून ते परिसमाप्तीपर्यंत, शिवरायांपासून दुसऱ्या बाजीरावापर्यंत राज्यकार्यासाठी तन – मन – धनाने श्रमली. प्राणांची बाजी लावायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यांनी केलेला त्याग, भोगलेले क्लेश आणि घेतलेले कष्ट यांचा विचार केला तर त्यांच्या वाट्याला असलेली धनदौलत आणि मानमराबत फारच खुजे दिसू लागतात. पुणे जिल्ह्यातील शिरूरजवळील तळेगाव (ढमढेरे) येथील ढमढेरे घराण्याचे नाव या यादीत आग्रक्रमाने चमकणाऱ्यांमधील आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे छत्रपतींची कर्तबगारी एवढी डोळे दीपवणारी होती की ते महाराष्ट्राचे नायक, महानायक बनले. त्यांचे पोवाडे वर्णन्याची अहमहमिका लागली का, मात्र या प्रक्रियेत त्यांना व नंतरच्या राज्यकर्त्यांना साहाय्यभूत ठरलेल्या पराक्रमी पुरूषांकडे, घराण्यांकडे काहीसे दुर्लक्ष झाले ही उणीव ढमढेरे घराण्यापुरती प्रा. पांडुरंग बलकवडे आणि डॉ. पद्माकर गोरे यांनी भरून काढली आहे. मूळ अस्सल कागदपत्रांच्या आधार त्यांनी प्रसिद्ध केलेली प्रस्तुतची “मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान” ही कृती  केवळ एक उत्तम ऐतिहासिक दस्तऐवज तर आहेच, परंतु ती मराठेशाहीतील इतर घराण्यांसाठी पथदर्शक ठरावी अशी आहे. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान”

Your email address will not be published. Required fields are marked *