Description
भारतातील आदिवासी भारत स्वातंत्र्यानंतर अनेकांच्या आकर्षणाचा विषय बनला आहे. भारतीय आदिवासींच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक व राजकीय जीवनाशी निगडीत विभिन्न विषयावर यापूर्वी कधी न झालेले अध्यायने, संशोधन मागील तीन ते चार वर्षात झाल्यास आपल्याला दिसून येते. भारताच्या मूळनिवासीयांना आदिवासी नाव का पडले ? आदिवासींचे तीन वर्ग कोणते ? खरच आदिवासी कोणास म्हणावे ? मग गोंड जमाती कोणत्या ? गोंड जमाती कोणास म्हणावे त्यांच्या विकासाची चळवळ कशी उभी झाली. नक्षलवाद, कुपोषण, गोंड जमातीची उत्पत्ती, त्यांचे सगा व गोत्र, गोत्रकुळे, त्यांच्या पारंपरिक पद्धती, त्यांचे साहित्य, कला, त्यांची स्वत:ची गोंडी भाषा, गोंड राजवंश व त्यांचे ऐतिहासिक भव्य किल्ले व पुरातन वास्तु, गोंड जमातीची विभागणी कशी झाली? त्यांचे व्यवसाय, परंपरा काय आहेत ? जन्म, मृत्यु, देवकरण या समयी ते कोणते सोपस्कार करतात आणि पूर्वाजावर त्यांची किती गाढ़ श्रद्धा आहे या बाबींचा समाजमनावर व संशोधकांवर चांगला प्रकाश पडेल. यासारख्या गोंड जमातीच्या पूर्व इतिहासाचे रेखीव चित्र समाजाला समजेल अशा साध्या व सरळ भाषेत दिले आहे.

Reviews
There are no reviews yet.