Description
”हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांच्याविषयी गेली उणीपुरी दोनशेवर्षे जे गैरसमजांचे पीक आले आहे; त्याला कारणीभूत ठरलेली मल्हार रामराव चिटणीसची बखर उत्तरपेशवाईत रचली गेली. मराठेशाहीच्या ऱ्हासाचा व नैतिक अधःपतनाचा काळ म्हणून जो कलंकित झालेला तो दुसऱ्या बाजीरावाचा हा काळ. कुलीन स्त्रियांची अब्रू जिथे धोक्यात होती व चवचाल सरदार तसेच त्यांच्या टवाळखोर रखेल्यांचा व बायकांचा धटकंचुकीसारखा मुक्त लैगिक चाळा ज्याकाळात राजरोसपणे चालत असे. त्याकाळात नैतिक आदर्शांना ओहोटी लागली होती राधाकृष्णांच्या शृंगारसपूर्ण काव्याची वाहवा करणाऱ्या दरबारी पंडितांना जिथे प्रतिष्ठा होती. तसेच सर्वसाधारण भटभिक्षुकांना कोणतेही कष्ट न करता जिथे ”रमणा” मिळण्याची रेलचेल होती; अशा काळात रचलेल्या या बखरीत आपल्या पूर्वसूरीवरील अन्यायाचा वचपा काढण्याच्या हेतूने संभाजींना खलपुरुष ठरविण्यासाठी आपली लेखणी चिटणीसाने खर्ची घातली. जोडीला मराठा द्वेष ठासून भरलेला होताच.”
Reviews
There are no reviews yet.