Description
शहाजीराजांचे असामान्य धैर्य, त्यांची स्वतंत्र राज्यकारभार करण्याची वृत्ती, त्यांनी मोगलांना दिलेला एक हाती लढा यापासून शिवाजीराजांना प्राथमिक प्रेरणा मिळाली. शिवाजीराजांचा राजमुद्रा व ध्वज शाहजीराजांची देणगी आहे. शिवाजीराजांचे पालनपोषण, संगोपन, त्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्याची व्यवस्था जिजाऊंनी केली. त्यांनी शिवाजीराजांवर अत्युच्च प्रतीचे संस्कार केले, त्यांच्या मनात स्वतंत्र राज्याच्या निर्मितीचे बीजारोपण केले. हे स्वराज्य अस्तित्वात येण्यासाठी शिवरायांना मार्गदर्शन करून त्यांची खंबीरपणे पाठराखण केली. त्यामुळे जिजाऊ ह्याच शिवाजीराजांच्या मुख्य प्रेरणास्त्रोत असल्याचे स्पष्ट होते. वारकरी चळवळीच्या व विशेषतः संत तुकारामांच्या प्रबोधन कार्यामुळे शिवाजीराजांच्या स्वराज्यस्थापनेत मदत झाली. त्यांच्या अभंगामुळे समाजजागृती झाली व हजारो मावळे शिवकार्यात सहभागी झाले. या सर्वांचे शिवकार्यात निश्चितच महत्वाचे स्थान आहे. दादोजी व रामदास यांचा शिवाजीमहाराजांच्या स्वराज्यस्थापनेशी दूरान्वयानेही संबंध नाही हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. त्यांनी स्वतःही असे श्रेय घेतलेले नाही. त्यांच्या जात्यभिमानी अनुयायांनी ओढूनताणून रचलेला हा बनाव आहे. यामध्ये रामदास व दादोजी यांच्याच इभ्रतीचे धिंडवडे निघाले आहेत.
Reviews
There are no reviews yet.