Description
आंबा हा भारताचे राष्ट्रीय फळ आहे. प्रस्तुत ग्रंथात जुन्नर तालुक्यातील आंब्याचा प्राचीन ते अर्वाचीन असा सलग इतिहास मांडला आहे. प्राचीन व मध्ययुगीन कालखंडासंदर्भात योग्य त्या संदर्भासह मजकूराची मांडणी याठिकाणी केली आहे. सातवाहन राजवंशाने खोदलेल्या लेण्यांमध्ये आंब्याचे आलेले उल्लेख, हाल सातवाहनाची गाथासप्तशती या सातवाहनकालीन ग्रंथांमध्ये आंब्याचे आलेले सर्व उल्लेख श्लोकांसह लेखकांनी दिलेले आहेत. यादवकाळ, मोगल, शिवकाळ, पेशवेकाळ आणि प्रात्यक्षिकांच्या साह्याने आधुनिक आंबे लागवडीची सविस्तर आणि साधार माहिती या ग्रंथात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आद्न्यापत्रातून आंब्याचा केलेला उल्लेख, जुन्नर तालुक्यात औरंगजेबाने केलेली आंबा लागवड, आंब्याचा मोहोर जपण्यासाठी केलेले प्रयत्न, आधुनिक काळात आंबा लागवड काशी करावी व आंब्याचे पीक कैसे जपावे याविषयीची माहिती या ग्रंथात दिली आहे.
जुन्नर तालुक्यातील आंब्याचा इतिहास जुन्नरचा आंबा ते जुन्नर हापूस यापासून तर अफीजबाग – हाबशीबाग – हापूसबाग ते शिवनेर हापूस पर्यंतचा आंब्याचा सर्व प्रवास, एका अर्थाने शिवनेर हापूसची जीवनगाथा या ग्रंथात चित्रित करण्यात आली आहे. अलंकारिक काल्पनिक मांडणीला फाटा देऊन अव्वल साधनांच्या भक्कम आधारावर हा संशोधनपर ग्रंथ साकार झालेला आहे. जुन्नरच्या आंब्याची माहिती देणारा हा पहिलाच ग्रंथ आहे. सामान्य वाचक, जुन्नरला येणारे पर्यटक आणि अभ्यासक यासर्वांनाच तो उपयुक्त ठरेल आणि मराठीतील आम्रगाथाविषयक साहित्यात तो आपले वैशिष्टपूर्ण स्थान निर्माण करेल, अशी आशा वाटते.
Reviews
There are no reviews yet.