जुन्नरची लेणी

180.00

50 in stock

पुस्तकाचे नाव जुन्नरची लेणी
लेखक लहू कचरू गायकवाड
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १४४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम

Description

भारतात लेणी खोदण्याच्या कलेची मूळ प्रेरणा इराणमधून आली असावी. इसवी सन पूर्व पाचव्या शतकात इराणच्या अकमोनिथ राजवंशाच्या सम्राटांनी त्यांच्या वंशजांची थडगी डोंगरात कोरविली होती. ती सर्व थडगी ‘नक्र-इ- रूस्तुम’च्या डोंगरामध्ये आहेत. डायरस आणि सायरस या इराणी सम्राटांनी भारतावर सवारी करून सिंध व पंजाब हे प्रांत जिंकून पर्शियन साम्राज्यास जोडले होते. त्याचा सांस्कृतिक परिणाम भारतावर झाला. सम्राट अशोकाच्या काळात खोदलेल्या लोमस ऋषींच्या लेण्यांचे आणि डायरसच्या  थडग्यांचे दर्शनी भाग समान आहेत. त्यामुळे हा वास्तुप्रकार प्राचीन इराणमधून भारतात आला असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये अल्मोना इड  बसाल्ट नावाचा पाषाण आहे. कोरीव शिल्पकामास सोयीस्कर व सुलभ असल्यामुळे या ठिकाणी अलौकिक कलाकृतींची निर्मिती झाली. लेणींमधील शिल्प ही डोंगरकपारीत खोदली असल्यामुळे त्यांना ‘ गिरीशिल्प’ या नावानेही संबोधतात. भारतात इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात लेणी कोरण्यास सुरुवात झाली. पुढील १२०० वर्षे हा वास्तुप्रकार विकसित होत गेला. भारतातील सर्वात प्राचीन लेणी इसवी सन पूर्व २५० च्या सुमारास सम्राट अशोकाने  जैन धर्मियांच्या आजीवक साधूंसाठी बिहारमधील बाराबर टेकड्यांमध्ये कोरविल्या. भारतामध्ये बिहार, ओडिशा, गुजरात, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश ही राज्ये सोडल्यास बाकी सर्व लेणी महाराष्ट्रामध्ये आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जुन्नरची लेणी”

Your email address will not be published. Required fields are marked *