Description
संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाचा सरदार झुल्फिकार खान याने रायगडाला वेढा दिला. प्रत्यक्ष राजधानीच संकटात असल्यामुळे मराठ्यांचे राज्य बुडणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती. परंतु महाराणी येसूबाई यांनी संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांचे मंचकारोहण केले व त्यांना रायगडावरून सुरक्षितरीत्या बाहेर जाण्यास सांगितले. स्वराज्य अबाधित राहावे याच एकमेव हेतूने छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून बाहेर पडले. काही निवडक विश्र्वासू सरदारांसह महाराज प्रतापगड, पन्हाळगड मार्गे दक्षिणेमध्ये उतरले व त्यांनी प्रदीर्घ प्रवासानांतर जिंजीचा किल्ला गाठला। मुघलांनी त्यांचा पाठलाग करूनही ते त्यांच्या तावडीत कधीच सापडले नाहीत. पुन्हा एका अवघड प्रसंगी मराठ्यांचे छत्रपती शत्रूच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले होते.
त्यांच्या या संपूर्ण प्रवासाचे वर्णन करणारा “राजाराम चरित्रम ” अर्थात ”जिंजीचा प्रवास” हा ग्रंथ केशव पंडित यांनी संस्कृतमध्ये लिहिला होता. या ग्रंथांमध्ये काव्याचे पाच सर्ग असून सुमारे 275 श्लोक आहेत. शिवकालीन असणाऱ्या ग्रंथांपैकी केशव पंडित कृत “राजाराम चरित्रम” हा अत्यंत दुर्मिळ असा ग्रंथ आहे. या संस्कृत ग्रंथाचे भाषांतर वा. सी. बेंद्रे यांनी मराठी व इंग्रजीमध्ये केले आहे. म्हणूनच हा आजच्या इतिहास संशोधक व अभ्यासकांसाठी एक बहुमूल्य ग्रंथ आहे.
Reviews
There are no reviews yet.