Description
३५० वर्षांनतर प्रथमच मूळ संस्कृत श्लोकांसह :
बुध म्हणजे शहाणा, विद्वान व भूषण म्हणजे दागिना असा अर्थ असलेला हा ‘बुधभूषण’. छत्रपती संभाजीराजांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या ‘बुधभूषण’ ह्या संस्कृत ग्रंथाचे संस्कृतसह मराठी अनुवाद आहे.
श्री शंभो: शिवजातस्य, मुद्रा द्यौरिव राजते ।
यदंकसेविनो लेखा, वर्तते कस्य नोपरि ।।
छत्रपती शिवाजीराजे यांचे पुत्र श्री. संभाजीराजे यांची मुद्रा आकाशाप्रमाणे शोभत आहे. तिचे अंकसेवन करणारांचा (आधार घेणारांचा) पगडा (प्रथम) कोणावर पडणार नाही? (सगळ्यांच्यावर पडेल.) (षोडश मुद्रा)

Reviews
There are no reviews yet.