भाषा-साहित्य चिंतन

270.00

1 in stock

पुस्तकाचे नाव भाषा-साहित्य चिंतन
लेखक मे. पुं. रेगे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २३२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २८० ग्रॅम

Description

”भाषा-साहित्य चिंतन” हे पुस्तक रेगे सरांच्या वैचारिक व्यक्तिमत्त्वाचा एक आगळा-वेगळा आविष्कार आहे. विविध भाषा (मराठी, संस्कृत, इंग्रजी) तसेच विविध भाषारूपे (प्रमाणभाषा, बोलीभाषा, तांत्रिक परिभाषा, ज्ञानभाषा, दैनंदिन लोकव्यवहाराची भाषा, व्यवसाय विशिष्ट मिश्रभाषा इ.) यांविषयी रेगे सरांनी लिहिलेली टीपणे, लेख या पुस्तकात अंतर्भूत आहेत. भाषाशुद्धीचा अतिरेकी व अनाठायी आग्रह भाषेचा विकास – विस्ताराला बंदिस्त कुंपणे घालतो. याउलट मराठी भाषेच्या विस्तीर्ण परिघात संस्कृत, इंग्रजी, फारसी असे परभाषिक असंख्य शब्द सामावून घेतल्यानेच मराठी भाषा अधिक समृद्ध, संपन्न झाली आहे; तिचा विस्तार- विकास झाला आहे. हे रेगे सरांनी आपल्या लेख टिपणांतून दाखवून दिले आहे. अशा अनेक भाषिक विषयांवर व समस्यांवर मार्मिक व विश्लेषक विवेचन आणि भाष्य करून रेगे सरांनी स्वत:ची मते मांडली आहेत.

वैचारिक व ललित साहित्यांविषयी विस्तृत व विवेचक भाष्य करून रेगे यांनी स्वत:ची भूमिका व मते मांडली आहेत. सद्य स्थितीतील वैचारिक मराठी साहित्यके दुभंगलेपण, कुंठित अवस्था व दु:स्थिती यांविषयी त्यांनी खंत व असमाधान व्यक्त करून सुधारणेचे मार्गही सुचवले आहेत. वैचारिक साहित्याच्या तुलनेत आधुनिक मराठी ललित साहित्य हे अधिक स्वायत्त, कसदार व जामदार असल्यास मत मांडून रेगे सरांनी नवनवोन्मेषशाली आधुनिक साहित्य- आविष्कारांविषयी आस्वादक व स्वागतशील भूमिका मांडली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भाषा-साहित्य चिंतन”

Your email address will not be published. Required fields are marked *