Description
आजच्या वेगाने बदलणाऱ्या समाजात शिक्षण क्षेत्रही नव्या गरजांनुसार सतत विकसित होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने २०२० (NEP 2020) शिक्षणव्यवस्थेत झालेले व्यापक बदल लक्षात घेता, शिक्षक – विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी अद्ययावत, समकालीन आणि समग्र अशी शैक्षणिक साहित्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. हाच विचार मनात ठेवून समकालीन भारतीय शिक्षण : लिंगभाव व समाज या नवीन पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकात भारतीय शिक्षण व्यवस्थेतील बदलते प्रवाह, लिंगसमता, सामाजिक न्याय, समावेशक शिक्षण बहुसांस्कृतिकता तसेच शिक्षणातील अस्तित्वात असलेल्या असमानता व त्यावरील उपाययोजना यांचा सखोल अभ्यास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या सामाजिक वास्तवाचे भान ठेवत, शिक्षणव्यवस्थेत सर्वसमावेशक दृष्टिकोन कसा विकसित करावा याची विस्तृत चर्चा पुस्तकात करण्यात आली आहे.

Reviews
There are no reviews yet.