Description
गांधीजी व बाबासाहेबांच्या विचार व कार्यात बरेच साम्य देखील आढळते. दोघांचीही अहिंसेवर सखोल श्रद्धा होती. दोघांनीही खादीला प्राधान्य दिले होते. दोघांनीही अस्पृश्यता निर्मूलनासाठी मंदिर प्रवेशाचा प्रश्न हाती घेतला होता. दोघांनीही आंतरजातीय व्हिवाविवाहाचे समर्थन केले होते.गांधीजींनी तर आपल्या एका मुलाचा आंतरजातीय विवाह केला.दोघांनाही जातिभेद मान्य नव्हता. आणि म्हणून त्यांचे कार्य एकमेकांच्या विरोधी नव्हते; ते परस्पर पूरक होते. गांधीजींच्या मनात बाबासाहेबांविषयी कटुता नव्हती. दोघांचेही गंतव्य एकच होते.
शेवटी शेवटी गांधीजींचे विचार आमूलाग्रपणे बदलले होते. आंतरजातीय विवाहितांपैकी एकजण अर्थात वधू किंवा वर अस्पृश्य असल्याशिवाय ते वधूवरांना आशीर्वाद देत नसत. बाबासाहेबांचा दुसरा विवाह आंतरजातीय होता. तो झाला तेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांनी पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले. त्या पत्रात त्यांनी असे लिहिले होते कि, बापू जिवंत असते तर त्यांनी दोघांनीही आशीर्वाद दिले असते बाबासाहेब हे सरदार पटेलांच्या म्हणण्याशी सहर्ष सहमत होते.
गांधीजींच्या हे सांगण्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बनले. त्यांना विश्वास होता कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाला उत्कृष्ट अशी राज्यघटना देतील. आणि त्यांनी ती दिली.
Reviews
There are no reviews yet.