Description
क्यूबा हा जेमतेम एक कोटीच्या जवळपास लोकसंख्या आणि शंभर चौरस किलोमीटर इतक्या आकाराचा देश; पण बलाढ्य अशा अमेरिकेच्या वर्चस्वाला क्यूबानं लढत दिली आणि अमेरिकेला नामोहरम केलं. अशा या क्यूबाच्या नेतृत्वाची धुरा कॅस्ट्रोनं जवळपास पाच दशकं सांभाळली.
क्यूबाचा संघर्ष सहा दशकांहून जास्त काळ चालला होता. या संघर्षाचा कर्ताकरविता होता, झुंजार क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो !
जगात सगळीकडे बोकाळलेली भांडवलशाही, अतिमुक्त विचारसरणी आणि पाश्चिमात्य चंगळवादानं थैमान घातलेलं असताना, या सगळ्याला सातत्यानं विरोध करून कॅस्ट्रोनं आपली भूमिका ठामपणे जगासमोर मांडली. कॅस्ट्रोच्या वादळी, नाट्यपूर्ण आणि संघर्षपूर्ण आयुष्याचा प्रवास सर्वसामान्यांना अवाक करणारा आहे. त्याच्या थक्क करून सोडणाऱ्या आयुष्याची वाचकांना खिळवून ठेवणारी ही कहाणी.
Reviews
There are no reviews yet.