Description
स्वामी विवेकानंद हे आधुनिक भारताचे एक श्रेष्ठतम शिल्पकार होते. द्रष्टेपण आणि कर्तृत्व यांचा विरळा संयोग लाभलेल्या या कर्मवीराने आपल्या देशबांधवांना त्यांच्या आध्यात्मिक, नैतिक व बौद्धिक आलस्याच्या महानिद्रेतून खडबडून जागे केले. सर्वच चराचरात वसत असणाऱ्या दैवी अंशाकडे त्यांनी लक्ष वेधले, त्यामुळे त्यांचा संदेश हा विश्वव्यापी बनला. नोबेल पारितोषिकाचे मानकरी, प्रथितयश फ्रेंच कादंबरीकार रोमाँ रोलाँ यांनी त्यांच्याविषयी असे उद्गार काढले- “स्वामी विवेकानंदांच्या वचनांना स्पर्श करावयाचाच अवकाश, विजेचे धक्के बसावे, अशा स्फूर्तिदायी विद्युतलहरी माझ्या शरीरात आजही संचारू लागतात. मग जेव्हा या वीराच्या प्रत्यक्ष मुखातून ही तेजस्वी वचने बाहेर पडत असतील, तेव्हा तर ती केवढे प्रचंड धक्के देत असतील, केवढ्या विलक्षण स्फूर्तिलहरी ऐकणाऱ्याच्या हृदयात उसळवीत असतील!”- विवेकानंदांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचा रोमाँ रोलाँवर अतिशय प्रभाव पडला होता. त्यांनी लिहिलेल्या विवेकानंदांच्या चरित्रातून त्याचा स्पष्ट प्रत्यय येतो.
Reviews
There are no reviews yet.