Description
श्री तुकाराम महाराजांनी बहुजनसमाजाला अज्ञात असे आध्यात्मिक ज्ञानाचे भांडार फोडून ते शुद्रादिकांना खुले केले. ज्ञान हे पवित्र पण या पवित्र ज्ञानाचा अपवित्र उपयोग करून धर्ममार्तंडांनी सामान्य जनता अज्ञानी ठेवून त्यांच्यावर वर्चस्व गाजविले होते. पण वारकऱ्यांच्या ठिकाणी जातिभेद व पक्षभेद नाहीत. इतकेच काय पण स्त्री-पुरुष असाही भेद भक्तिमार्गात आढळून येत नाही. वर्णाश्रमधर्माने कृत्रिम जातिभेदांचे तांडव आरंभिले होते. त्याला वारकरी सांप्रदायाने सुरूंग लावला व विष्णुदास जातिभेदातीत आहेत. असे त्यांनी आपल्या आचरणाने दाखविले. अशा अनेक गुणांनी मंडित असे श्री तुकाराम महाराज यांचे चरित्र भक्तिमार्ग अंतःकरणाने व रसाळ वाणीने श्री. पांडुरंग बाळाजी कवडे यांनी लिहिले आहे. ऐतिहासिक दृष्टया या चरित्रात दंतकथा किंवा भाविक कथा यांना विशेष स्थान दिले नाही. सर्व माहिती ग्रंथांतरीच्या व अभंगवाणीच्या आधारे दिली आहे. यामुळे या चरित्रास तुकाराम वाङ्मयात इतिहासाचे स्थान प्राप्त होईल यात शंका नाही.
भाऊराव पाटील, रयत सेवक.
(संस्थापक, रयत शिक्षण संस्था, सातारा.)
Reviews
There are no reviews yet.