साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र आणि चिंतन

270.00

1 in stock

पुस्तकाचे नाव साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र आणि चिंतन
लेखक संपत जाधव
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १६८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम
Category:

Description

माणूस जगतो का? नई जगण्यासाठी धडपडतो का? याचा विचार आम्ही करणे जरूरीचे आहे. त्या धडपडणाऱ्या पतिताला आम्ही मित्रा समजतो, तो उंच गगनात गेलेल्या विद्युतमय मनोऱ्यावर उभे राहून विजेच्या तारा जोडतो, खाणीत उभ्या कड्यावर चढून सुरुंगाला पेट देतो किंवा पोलादाचा रस करणाऱ्या भट्टीवर तो निर्भय वावरतो आणि या सर्व ठिकाणी मृत्यू त्याची वाट पाहत असते. कधी कधी त्याची व मृत्यूची गाठ पढून हा दलित कष्ट करीत करीत मरण पत्करतो. ही जगण्याची नि मरण्याची आगळी रीत आहे. ती लेखकाने समजून घ्यावी. सुरुंगाना पेट देता देता किंवा पोलादाच्या रसात बुडून मरणे, नाही तर विजेच्या धक्क्याने मरणे, दिवाळे निघाले म्हणून शेअर बाजारात मरणे या मरणातील अंतर लेखकाने मोजून पाहावे नि श्रेष्ठ मरण कोणते ते निश्चित ठरवावे.

दलितातही सर्व भावना इतरांप्रमाणे सदैव जागृत असतात. पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो. कारण तो हाडामांसाचा केवळ गोळा नसतो. तो निर्मितीक्षम असतो. तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून दौलतीचे डोंगर रचतो. अशा या महान मानवावर महाकाव्य रचणारा त्याला हवा असतो…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र आणि चिंतन”

Your email address will not be published. Required fields are marked *