Description
महाराणा प्रताप ( इसवी सन 1540-1597) भारतीय इतिहासातील एक गौरवपूर्ण विभूती आहे. जोपर्यंत जगात शौर्य, देशाभिमान व सत्य यांचा सन्मान होत राहील तोपर्यंत महाराणा प्रतापांचे नाव अमर राहील. या पुस्तकात राजेन्द्र शंकर भट्ट यांनी राणा प्रतापांच्या जीवनाचे महत्त्व विशद केले आहे, पण त्याचबरोबर श्रद्धा सत्याला झाकोळून टाकणार नाही याची काळजी घेतली आहे.
महाराणा प्रताप मेवाडाच्या सिंहासनावर फ़क्त पंचवीस वर्षेच होते, पण त्या थोड्या अवधीतही त्यांनी देश व काल यांच्या सीमा पार करणारी अमर कीर्ति संपादन केली. ते आणि त्यांचे राज्य म्हणजे वीरता, बलिदान व देशाभिमान यांचे जणू प्रतीकच बनले. तसे पाहिले तर मेवाड प्रथमपासूनच रजपूत राज्यांचे अग्रणी होते. मेवाडच्या राजांनी आपले सामंत व प्रजानन यांच्या सहकार्याने अशी परंपरा स्थापन केली की लहान क्षेत्रफळ व कमी लोकसंख्या त्यांच्या कीर्तीच्या आड येऊ शकली नाहीत. अशी अत्यंत कठीण परिस्थितीही आली की तेव्हा मेवाडचा झेंडा कललेला दिसला; परंतु मेवाडी लोकांच्या पराक्रमाने व तेजाने तो परत डौलाने फडकू लागला.
Reviews
There are no reviews yet.