Description
हिंदूस्थानातील अनेक राजा महाराजांनी आपल्या शौर्याने रणांगणावर पराक्रम केले. अनेक राजांनी आपल्या मनगटाच्या बळावर शत्रूच्या मनात दहशत बसविली. तर काही राजांनी आपल्या कर्तृत्वाने लोकांच्या मनावर अधिराज्य केले. अशा सर्व राजा महाराजांची अनेक मराठी चरित्रे उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात हिंदुस्थानात अनेक संस्थाने अस्तित्वात होती. संस्थानाअंतर्गत सुधारणा करण्याचे त्यांना स्वातंत्र्य होते. प्रजेचे हित जपणारे मोजकेच राजे होते. त्यात महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नाव आघाडीवर होते.
त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. संस्थानात इंग्रजांना अचंबित करणारा आश्वासक बदल केला. संस्थानाची ‘ न भूतो भविष्यती’ प्रगती केली. प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्यामुळे ते हिंदुस्थानात नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांची काळापुढे पाहण्याची दृष्टी होती. प्रत्येक सुधारणेत आधुनिकता आणि लोकअभिमुखता आणली. समकालीन जगातील प्रत्येक सुधारणा प्रथम बड़ोदा संस्थानात केली. इंग्रजांचा विचाराने पराभव करणारे ते पाहिले राजे होते. त्यांनी जागतिक पातळीवरील वैचारिक राष्ट्रीय परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविले. जागतिक पातळीवर विचारवंतांचे नेतृत्त्व केले. त्यात आपल्या विचारांचा ठसा उमटवला. त्यामुळे त्यांची विचारवंत राजा, तत्वज्ञ राजा अशी ओळख निर्माण झाली.
त्यांची स्वातंत्र्यपूर्व कालखंडात चरित्रे लिहिली गेली. ही चरित्रे आदर्श जीवनाचा आढावा घेणारी आहेत. दुर्मिळ आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. आजच्या काळातही मार्गदर्शक आहेत, ती अभ्यासणे महत्वाचे ठरेल.

Reviews
There are no reviews yet.